MPSC 2026 भरती: सहाय्यक शासकीय अभियोक्ता व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (244 पदे) – संपूर्ण माहिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत 2026 मध्ये कायदा क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालुन आली आहे. सहाय्यक शासकीय अभियोक्ता (Assistant Government Pleader) आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (Additional Public Prosecutor) गट-अ पदांसाठी जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 244 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जर तुम्ही कायदा पदवीधर असाल आणि न्यायालयीन अनुभव असेल, तर ही भरती तुमच्यासाठी उत्तम करिअर संधी ठरू शकते. प्रत्येक जिल्ह्यासाठी राज्य शासन एक जिल्हा सरकारी अभियोक्ता व एक किंवा अधिक अतिरिक्त सरकारी अभियोक्ते नेमू शकते.
अतिरिक्त सरकारी (वकिलाची) भूमिका अभियोक्ता :- राज्य शासनाच्या वतीने गुन्हेगारी खटले न्यायालयात लढविणारा वकील असतो.
भरतीचा आढावा व पदांचा तपसील
| घटक | तपशील |
|---|---|
| संस्था | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) |
| पदाचे नाव | सहाय्यक शासकीय अभियोक्ता व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (ग्रेड-A) |
| एकूण पदे | 244 |
| अर्ज सुरू | 20 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 9 एप्रिल 2026 |
| वेतन | ₹67,700 ते ₹2,08,700 |
| शैक्षणिक पात्रता | Law Degree (LLB) |
| अनुभव | 8 वर्षे (High Court/ Subordinate Court) |
| वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे (आरक्षित: 43 वर्षे) |
| अर्ज शुल्क | Open: ₹719 / Reserved: ₹449 |
पदांची माहिती
या भरती अंतर्गत खालील पदांचा समावेश आहे:
• सहाय्यक शासकीय अभियोक्ता
• अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (ग्रेड-A)
ही पदे महाराष्ट्र शासनाच्या कायदा व न्याय विभागाशी संबंधित आहेत. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना न्यायालयात शासनाच्या बाजू ठेवन्याची जबाबदारी दीली जाते.
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे:
मान्यताप्राप्त विद्यापीठाची LLB (Law Degree) किंवा LLM असणे आवश्यक आहे.
अनुभव
उमेदवाराकडे खालीलपैकी एक अनुभव असणे गरजेचे आहे:
• उच्च न्यायालयात (High Court) वकील म्हणून काम केलेले असावे
किंवा
• कनिष्ठ न्यायालयात (Subordinate Court) किमान 8 वर्षांचा अनुभव
Forest Bharti बद्दल माहितीसाठी येथे क्लिक करा 👉 Forest Bharti 2026
वयोमर्यादा
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 38 वर्षे
SC/ST/OBC उमेदवारांसाठी: 43 वर्षे पर्यंत सवलत
वेतन
या पदासाठी आकर्षक वेतन देण्यात येते:
₹67,700 ते ₹2,08,700 (Level S-23) यासोबतच विविध भत्ते (DA, HRA इ.) मिळतात.
निवड प्रक्रिया
अर्जांची संख्या जास्त असल्यास → लेखी परीक्षा
अर्ज कमी असल्यास → थेट मुलाखत
अंतिम निवड ही गुणवत्ता व अनुभवावर आधारित असेल.
प्रश्नमंजुषेच्या मदतीने आपले ज्ञान वाढवा. प्रश्नमंजुषा सुरू करण्यासाठी येथे क्लिक करा 👉Gk Free Mock test
महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरू: 20 मार्च 2026
शेवटची तारीख: 9 एप्रिल 2026
महत्वाच्या सूचना
• अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नीट वाचा
• सर्व कागदपत्रे तयार ठेवा
• अंतिम तारखेपूर्वी अर्ज पूर्ण करा
• चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द होऊ शकतो
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या👉https://mpsc.gov.in/
MPSC 2026 अंतर्गत सहाय्यक शासकीय अभियोक्ता आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पदांसाठीची ही भरती कायदा क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. उच्च वेतन, प्रतिष्ठित पद आणि सरकारी नोकरीची स्थिरता यामुळे ही भरती अत्यंत आकर्षक ठरते.
अधिक माहितीसाठी कृपया MPSC https://mpsc.gov.in/ च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
👉 “अशीच नवीन सरकारी भरती अपडेटसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा”https://whatsapp.com/channel/0029VbD5jyH3bbV3JJ89r440
